महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळमघ्ये अवकाळीच्या संकटात शेतकऱ्याने पिकावर फिरविला ट्रॅक्टर - पीक नुकसान यवतमाळ बातमी

जांब येथील राम ढोबळे या शेतकऱ्याकडे पाच एकर शेती आहे. बियाणे विकत घेण्यासाठी त्यांनी बैलजोडी विकली. शेतात राबून पीक वाढविले. मात्र, अवकाळी पावसाने स्वप्नांवर नांगर फिरविला.

अवकाळीच्या संकटात शेतकऱ्याने पिकावर फिरविला ट्रॅक्टर

By

Published : Nov 12, 2019, 6:53 PM IST

यवतमाळ - अवकाळी पावसामुळे शेतकरी पुरता देशोधडीला लागला आहे. कर्जबाजारी झाल्याने शेतकऱ्याने बैलजोडी विकून शेती केली. मात्र, पावसामुळे पीक मातीमोल झाले. त्यामुळे अवकाळीच्या संकटात सापडलेल्या पिकावर शेतकऱ्याने ट्रॅक्टर फिरविला.

अवकाळीच्या संकटात शेतकऱ्याने पिकावर फिरविला ट्रॅक्टर

हेही वाचा-आसनगावजवळ कार आणि गॅस टँकरमध्ये भीषण अपघात; २ जण जागीच ठार, २ गंभीर

जांब येथील राम ढोबळे या शेतकऱ्याकडे पाच एकर शेती आहे. बियाणे विकत घेण्यासाठी त्यांनी बैलजोडी विकली. शेतात राबून पीक वाढविले. मात्र, अवकाळी पावसाने स्वप्नांवर नांगर फिरविला. सोयाबीन पीक जागीच सडत असल्याचे बघून शेतकऱ्याने पिकावर ट्रॅक्टर फिरविला आहे. त्यात इतरही पीक होते. अवकाळीच्या नकुसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, अजून तलाठी, विमा कंपनीचे प्रतिनिधी आले नाही, असा आरोप ढोबळे यांनी केला. नुकसान झाल्याने आता शेती करायची इच्छा राहिली नाही. शेतात जाण्याची हिम्मत होत नाही. अशी विदारक चित्र आहे. शासनाने शेतकऱ्याचा अंत न पाहता तात्काळ सरसकट मदत देण्याची मागणी केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details