यवतमाळ - वणीपासून उमरखेडपर्यंत सर्वत्र पावसाने थैमान घातले आहे. नदी, नाल्या भरून वाहत आहेत. यामध्ये शेतीमधील माती मोठ्या प्रमाणात वाहून गेली आहे. त्यातल्या त्यात गुलाब वादळामुळे उद्धभवलेली परिस्थिती आणि नदीपात्रात सोडलेले पाणी यामुळे शेतकऱ्यांवरील संकट वाढले आहे. जिल्ह्यातील ईसापुर, देवगव्हाण, शेंबाळपिंपरी, गौळ बु, दगडधानोरा, जगापुर व उमरखेड तालुक्यातील बरीच पैनगंगेकाठील गावे बाधित झाले आहेत.
जोराच्या पावसामुळे पिकांचे नुकसान, इसापूर धरणातून पाणी सोडल्याने शेतकरी चिंतेत तातडीने सरसकट नुकसान भरपाई द्यावी
अतिवृष्टी व ईसापुर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे हजारों हेक्टर मधील सोयाबीन, कापुस, तुर, ऊस अशी हाती आलेली पिके नाहीशी झाली. त्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. अशावेळी पंचनामे करण्यात वेळ न दवडता तातडीने सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
लाखो रुपयांचे झाले नुकसान
पुसद तालुक्यातील देव गव्हाण गौळ बुद्रुक या गावांना पैनगंगा नदीच्या पाण्याचा फटका बसला आहे. नदीचे पाणी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात गेले आहे. त्यामुळे शेतातील तूर, सोयाबीन कांदा आणि ऊस हे पीक पाण्याखाली गेले. लाखो रुपयांचे नुकसान पाण्याचे झाले आहे. नुकसान ग्रस्त भागाची पाहणी व्हावी पंचनामा व्हावा अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांची आहे.
हेही वाचा -नुकसानग्रस्त भागातील ८१ टक्के पंचनामे पूर्ण, मदतीचा लवकरच निर्णय - वडेट्टीवार