यवतमाळ- येथील पुसदच्या शिवाजी वार्ड परिसरातून एका कुख्यात गुन्हेगाराला पुसद पोलिसांनी अटक केली आहे. शेख अख्तर उर्फ समीर शेख मुख्तार कुरेशी, असे आरोपीचे नाव आहे. पुसद पोलिसांनी त्याच्या जवळून एक रिव्हॉल्व्हर आणि चार जीवंत काडतुसे जप्त केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आर्म कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
यवतमाळमध्ये ४ जिवंत काडतुसासह रिव्हॉल्व्हर जप्त; कुख्यात गुन्हेगाराला अटक - कुख्यात गुन्हेगाराला अटक यवतमाळ बातमी
आरोपीने शिवाजी वार्डातील सार्वजनीक शौचालयाजवळ जमिनीवर गोळीबार केला होता. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. यात पोलिसांच्या दप्तरी आरोपीची पार्श्वभूमी गुन्हेगारी असल्याचेही पुढे आले आहे.
रिव्हॉल्व्हर
हेही वाचा-भारतीय वायुसेनेला मिळाली तीन 'राफेल' विमाने, वैमानिकांचे प्रशिक्षण सुरू
आरोपीने शिवाजी वार्डातील सार्वजनिक शौचालयाजवळ जमिनीवर गोळीबार केला होता. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केले आहे. यात पोलिसांच्या दप्तरी आरोपीची पार्श्वभूमी गुन्हेगारी असल्याचेही पुढे आले आहे. आरोपीने गोळीबार का केला? याचा तपास पोलीस करीत आहे.