यवतमाळ - दिवाळीत गायीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या काळात गायीची पूजा-अर्चा केली जाते. यवतमाळ आणि आर्णी तालुक्यात एक अनोखी परंपरा पाळली जाते. येथे चक्क बासरी आणि ढोलकीच्या तालावर गायी घोंगडीवर बसतात. हा क्षण डोळ्यात साठवण्यासाठी नागरिकांची गर्दी होते.
इथं बासरी अन् ढोलकीच्या तालावर गायी बसतात घोंगडीवर
दिवाळीत गायीला अनन्यसाधारण महत्व आहे. या काळात गायीची पूजा-अर्चा केली जाते. यवतमाळ आणि आर्णी तालुक्यात एक अनोखी परंपरा पाळली जाते. येथे चक्क बासरी आणि ढोलकीच्या तालावर गायी घोंगडीवर बसतात
हिवरी व तरोडा येथे बासरी आणि ढोलकीच्या तालावर धावत जाऊन गायी घोंगडीवर बसतात. राज्यात सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरु आहे. अनेक ठिकाणी दिवाळी सणाच्या काही परंपरा आहे. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी अर्थात बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज या दिवशी ग्रामीण भागात गायींचे पूजन करण्याची परंपरा आहे. यवतमाळ आणि आर्णी तालुक्यातील हिवरी व तरोडा येथे बासरी आणि ढोलकीच्या तालावर धावत जाऊन गायी घोंगडीवर बसतात.
गाय आणि गुराख्याचं नातं अतूट असते. गुराखी हा दररोज पशुधन घेऊन चराईसाठी रानावनात घेऊन जातो. आपला मालक दुसरा असला तरी पोषणकर्ता कोण आहे हे मुक्या पशुधनाला सांगण्यासाठी कुण्या भविष्यकाराची गरज नाही. दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे बलप्रतिपदा, गोधन या दिवशी एका पारावार गायींना ढोलकी आणि बासरीच्या तालावर नाचवले जाते. ग्रामीण भागात हा उत्सव बघण्यासाठी अजूनही गर्दी होते. हिवरी व तरोडा येथे बासरी व ढोलकीच्या तालावर गायी धावत येऊन घोंगडीवर बसतात. ही एक अनोखी कला मानली जाते. जिथे मुलगा वडिलांचे ऐकत नाही, तिथे मुकी जनावरे आपल्या रक्षणासाठी पाठीराखा असलेल्या व्यक्तीच्या शब्दाला मान देतात. ही एक अनोखी कला मानली जाते. जिथे मुलगा वडिलांचे ऐकत नाही, तिथे मुके जनावर आपल्या रक्षण करण्यासाठी पाठीराखा असलेल्या व्यक्तीच्या शब्दाला मान देतात, यातच माणुसकी सामावली आहे.