यवतमाळ - एका अनोळखी विवाहितेचा सोयाबीनच्या कुटारात जळलेल्या अवस्थेत शुक्रवारी माळ असोला येथे मृतदेह आढळला होता. दरम्यान शुक्रवारी 6 जानेवारीला त्या महिलेची ओळख पटली आहे. शरीर संबंध ठेवू न दिल्याने पतीनेच आधी गळा आवळून त्यानंतर सोयाबीनच्या कुटारात जीवंत जाळून ( Husband Killed Wife And Burn Dead Body In Farm ) पत्नीचा निर्घृण खून केला. याबाबतची धक्कादायक कबुली दस्तूरखूद्ध पतीनेच पोलिसांपुढे दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. माया संजय साखरे असे त्या खून ( Wife Refuses Physical Relation Murder By Husband ) करण्यात आलेल्या पत्नीचे तर संजय साखरे असे मारेकरी पतीचे नाव आहे. दरम्यान मारेकरी पती संजय साखरे याला न्यायालयात हजर केले असता, त्याला एका दिवसाची कोठडी ठोठावण्यात ( Court Order One Day Custody ) आली आहे.
सोयाबीनच्या कुटारात अर्धवट जळलेला महिलेचा मृतदेहमाळ असोला येथे 5 जानेवारी 2023 रोजी बाबूलाल चव्हाण यांच्या शेतातील सोयाबीनच्या कुटारामध्ये एका अनोळखी महिलेचा अर्धवट जळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून ( Found Woman Burn Dead Body In Yavatmal ) आला होता. घटनेनंतर माळआसोला येथील सरपंचानी पोफाळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजीव हाके यांना ही माहिती दिली. या माहितीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी, ठाणेदार राजीव हाके, ठाणेदार बिटरगाव प्रताप भोष, सहायक पोलीस निरीक्षक सांगळे, पोलीस उपनिरीक्षक राजेश पंडीत, उपनिरिक्षक गणेश राठोड, किसन राठोड, प्रकाश बोंबले, राम गडदे रुपेश चव्हाण, संदीप ठाकुर नितीन खवडे मुन्ना आडे, परशुराम इंगोले, यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाची पाहणी केली.