यवतमाळ- कोरोनामुळे राज्यभरात असलेल्या संचारबंदीच्या काळात लग्नविधी पार पाडण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. यावर मात करत एक अनोखा विवाहसोहळा जिल्ह्यात पार पडला. शासनाचे सर्व नियम पाळून आणि अगदी कोणताही लग्न मुहूर्त न पाहता हा विवाहसोहळा पार पडला. विशेष म्हणजे लग्नात जेवणाऐवजी फक्त चहापान करण्यात आले.
कोरोना इफेक्ट: यवतमाळमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत पार पडला विवाहसोहळा - यवतमाळमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पाळत विवाहसोहळा
यवतमाळ जिल्ह्यातील सवना येथील अमोल टेकाळे आणि माहूर तालुक्यातील नेहा चिचोंडे यांचा हा विवाहसोहळा होता. लग्न म्हटले, की लग्नपत्रिका, जागरण, गोंधळी, बँड, डीजे, निमंत्रित मान्यवर, सखे सोयरे, नातेवाईक, मित्रमंडळी असा मोठा गोतावळा जमतो. मात्र, या सर्व रितीरिवाजाला फाटा देत या दोन्ही कुटुंबानी एक अनोखा विवाहसोहळा पार पाडला.
![कोरोना इफेक्ट: यवतमाळमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत पार पडला विवाहसोहळा couple tied knot during lockdown](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-05:43-mh-ytl-03-vivah-vis-byte-7204456-05062020172827-0506f-1591358307-1067.jpg)
यवतमाळमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत पार पडला विवाहसोहळा
यवतमाळ जिल्ह्यातील सवना येथील अमोल टेकाळे आणि माहूर तालुक्यातील नेहा चिचोंडे यांचा हा विवाहसोहळा होता. लग्न म्हटले, की लग्नपत्रिका, जागरण, गोंधळी बँड, डीजे, निमंत्रित मान्यवर, सखे सोयरे, नातेवाईक, मित्रमंडळी, असा मोठा गोतावळा जमतो आणि थाटामाटात लग्नसोहळा पार पडतो. मात्र, या सर्व रितीरिवाजाला फाटा देत या दोन्ही कुटुंबानी एक अनोखा विवाहसोहळा पार पाडला. मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत विवाह संपन्न झाला.