यवतमाळ -उमरखेड तालुक्यातील मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या ढाणकीत नागरी सुविधांचा प्रचंड अभाव आहे. रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी नगरसेवक संंतोष पुरी यांनी खड्डयात बसून अनोखे आंदोलन करून ढानकी येथील समस्येकडे लक्ष वेधले.
अनोखे आंदोलन: रस्ता दुरुस्तीसाठी नगरसेवक बसला खड्डयात - रस्त्यासाठी नगरसेवकाचे आंदोलन
रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी नगरसेवकाने खड्डयात बसून अनोखे आंदोलन केले. वारंवार सांगून रस्त्याची चालण्यायोग्य डागडुजी देखील होत नसल्याने नगरसेवक संतोष पुरी यांनी रस्त्यावरील खड्ड्यात ठिय्या मांडून हे आंदोलन केले.
नगरपंचायत असलेल्या ढाणकीमध्ये पावसाळ्यात प्रभाग 17 मधील रस्त्यावर अनेक जणांचा अपघात झाला आहे . विशेष म्हणजे या रस्त्यावर विहीर आहे. या विहिरीला कठडा देखील नाही. त्यामुळे येथे गंभीर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. वारंवार सांगूनही रस्त्याची चालण्यायोग्य डागडुजी देखील होत नसल्याने नगरसेवक संतोष पुरी यांनी रस्त्यावरील खड्ड्यात ठिय्या मांडून बसल्याने नागरी सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सध्या आपण कोरोना सारख्या संकट काळातून जात आहोत. मागील काही दिवसांपासून पाऊस येत असल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ये-जा करताना नागरिक खड्डयात पडले आहे. कोरोना सोबतच अशाही गंभीर समस्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली.