महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्ह्यात आणखी एका पॉझिटिव्ह रुग्णाची भर, आयसोलेशन वॉर्डात एकूण 50 जण भरती - कोरोना अपडेट यवतमाळ

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत एकने वाढ झाली आहे. सध्य स्थितीत जिल्ह्यात 37 सक्रिय पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात एकूण 50 जण भरती आहेत.

यवतमाळ कोरोना
यवतमाळ कोरोना

By

Published : Jun 3, 2020, 6:21 PM IST

यवतमाळ - पुसद येथील कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेल्या व्यक्तीचा (वय 45) अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत एकने वाढ झाली आहे. सध्य स्थितीत जिल्ह्यात 37 सक्रिय पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात एकूण 50 जण भरती आहेत.

बुधवारी पॉझिटिव्ह आलेला व्यक्ती मुंबईवरून 25 मे रोजी यवतमाळ जिल्ह्यात आपल्या गावी आला होता. खोकल्याचा त्रास जाणवू लागल्यामुळे वैद्यकीय मदतीकरीता त्याने गावच्या सरपंचासोबत संपर्क केला. त्यानंतर पुसद येथील प्रशासनाने रुग्णवाहिका पाठवून सदर व्यक्तीला भरती करून घेतले. मात्र, मी कोणाच्याही संपर्कात आलो नाही, असे या व्यक्तीचे म्हणणे आहे. त्याच्या कुटुंबात चार सदस्य असून ते मुंबईला आहेत.

गत 24 तासात वैद्यकीय महाविद्यालयाला 6 अहवाल प्राप्त झाले. यापैकी एक पॉझेटिव्ह तर पाच अहवाल निगेटिव्ह आहेत. बुधवारी वैद्यकीय महाविद्यालयाने 30 नमुने तपासणीकरीता पाठविले असून सुरुवातीपासून आतापर्यंत 2,189 नमुने पाठविण्यात आले आहेत. यापैकी 2,159 नमुने प्राप्त तर 30 अप्राप्त आहेत. तसेच जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांचा आकडा 146 झाला आहे. यापैकी 37 ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह सद्यस्थितीत भरती असून 106 जण बरे होऊन घरी गेले आहेत. तर तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात एकूण 2013 जणांचे अहवाल आतापर्यंत निगेटिव्ह आले आहेत. संस्थात्मक विलगीकरणात 13 तर गृह विलगीकरणात 443 जण आहेत.

आदेशाचे उल्लंघन करणा-या युवकावर गुन्हा दाखल

मौजे हिवरी येथील अमोल देवीदास पवार (42) हा दुस-या जिल्ह्यातून हिवरी येथे आला होता. नियमानुसार त्याची आरोग्य तपासणी करून त्याला गृह विलगीकरणात राहण्यास सांगण्यात आले. ग्रामस्तरीय समितीने त्याच्या घरी भेट दिली असता सदर व्यक्ती घरात न थांबता सतत बाहेर फिरत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत ग्राम समितीने घरच्या सदस्यांना विचारल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे हिवरीचे तलाठी यांच्या तक्रारीवरून अमोल पवारविरुध्द भा.दं.वि.कलम 188 नुसार यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details