महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळ जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या नऊ हजाराच्या घरात

जिल्ह्यात मागील 24 तासात 43 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये वणी शहरातील 59 वर्षीय आणि दारव्हा तालुक्यातील 63 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

यवतमाळ कोरोना रुग्णसंख्या
यवतमाळ कोरोना रुग्णसंख्या

By

Published : Oct 3, 2020, 8:47 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या नऊ हजाराच्या घरात पोहोचली आहे. मागील 24 तासात 43 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये वणी शहरातील 59 वर्षीय आणि दारव्हा तालुक्यातील 63 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

शनिवारी 43 नवे रुग्ण आढळले. यामध्ये 28 पुरुष व 15 महिलांचा समावेश आहे. यात यवतमाळ शहरातील 19 पुरुष व 13 महिला, पुसद तालुक्यातील दोन पुरुष आणि एक महिला, बाभुळगाव तालुक्यातील दोन पुरुष, दिग्रस तालुक्यातील एक महिला, वणी तालुक्यातील एक पुरुष, घाटंजी शहरातील एक पुरुष, नेर तालुक्यातील एक पुरुष, कळंब तालुक्यातील एक पुरुष आणि दारव्हा तालुक्यातील एका पुरुषाचा समावेश आहे. जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून माहिती प्राप्त न झाल्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत 218 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह उपचार घेत असून होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्यांची संख्या निरंक असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाने म्हटले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 8 हजार 726 झाली आहे. जिल्ह्यात 272 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 256 जण भरती आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details