महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विनाकारण फिरणाऱ्यांची रस्त्यावरच कोरोना चाचणी; आठ जण पॉझिटिव्ह - कोरोना चाचणी यवतमाळ

यवतमाळ शहरातील वडगाव नाका (किरण मार्ट), दर्डानाका, बस स्थानक चौक, लाठीवाला पेट्रोल पंप, लोहारा चौक, जाजू चौक, आठवडी बाजार परिसर, दाते कॉलेज चौक, दत्त चौक या परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे. यात विनाकारण फिरणाऱ्यांवर आरोग्य विभागाची चमू व महसूल विभागातील अधिकारी यांच्याकडून तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

रस्त्यावरच कोरोना चाचणी
रस्त्यावरच कोरोना चाचणी

By

Published : May 12, 2021, 4:09 PM IST

यवतमाळ - कोरोना नियंत्रणासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहे. लॉकडाऊन काळात घरात सुरक्षित राहण्याचे आवाहनही वेळोवेळी करण्यात येत आहे. मात्र, काही ठिकाणी विनाकारण गावभर भटकणाऱ्यांची संख्याही जास्त दिसत आहेत. त्यामुळे तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी गावभर भटकणाऱ्यांची रस्त्यावरच कोरोना टेस्ट करण्याची मोहीम हाती घेतली आहे. मागील तीन दिवसात 980 लोकांची टेस्ट करण्यात आली. त्यात 8 जण पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांना शासकीय कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.

विनाकारण फिरणाऱ्यांची रस्त्यावरच कोरोना चाचणी

राज्यभर कोरोनाचा झपाट्याने पसार होत आहे. वाढत्या कोरोनाला लगाम लागावा म्हणून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तरीसुद्धा काही नागरिक विनाकारण भटकताना दिसत आहे. त्यामुळे अशा नागरिकांना चाप बसावा म्हणून प्रशासनाने जागेवरच कोरोना टेस्ट करायला सुरुवात केली. ही मोहीम तहसीलदार कुणाल झाल्टे यांच्या मार्गदर्शनात सुरु असून पॉझिटिव्ह आलेल्या नागरिकांना थेट कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येत आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे उगीच भटकंती करणाऱ्या नागरिकांना चाप बसला आहे.

एकाच वेळी आठ ते दहा ठिकाणी तपासणी

यवतमाळ शहरातील वडगाव नाका (किरण मार्ट), दर्डानाका, बस स्थानक चौक, लाठीवाला पेट्रोल पंप, लोहारा चौक, जाजू चौक, आठवडी बाजार परिसर, दाते कॉलेज चौक, दत्त चौक या परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे. यात विनाकारण फिरणाऱ्यांवर आरोग्य विभागाची चमू व महसूल विभागातील अधिकारी यांच्याकडून तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details