यवतमाळ - स्व. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन वॉर्डात काम करणाऱ्या दोन महिला परिचारिकांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली आहे. या दोन्ही परिचारिकांना त्याच ठिकाणी उपचारासाठी भरती करून घेण्यात आले आहे. कोरोना चाचणीसाठी त्यांचे नमुने घेऊन तपासणीसाठी नागपूर येथे पाठवले आहे. रिपोर्ट आल्यानंतर त्या कोरोना पॉझिटीव्ह आहेत की, निगेटिव्ह हे स्पष्ट होणार आहे. या दोन्ही परिचारिका कोरोनाच्या रुग्ण असलेल्या वॉर्डात काम करत होत्या.
आयसोलेशन वॉर्डात काम करणाऱ्या दोन परिचारिकांमध्ये कोरोनाची लक्षणे.... हेही वाचा...कोरोना विशेष: भारत तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर.. अंनिस कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांची माहिती
विलगीकरण कक्षातील दोघांना सुट्टी...
ताप, सर्दी, खोकला हे लक्षण आढळल्याने यवतमाळमधील स्व. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेल्या दोन जणांना सुटी देण्यात आली आहे. पुढील 14 दिवस त्यांचे होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे. सध्या विलगीकरण कक्षातील तीन जणांचे नमुने पॉझिटिव्ह असून नव्याने एक व्यक्तीला दाखल करण्यात आले आहे. दाखल झालेल्या नागरिकांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी दूरध्वनी वरून सांगितले.