यवतमाळ - शासकीय रुग्णालयात कोरोनाबाधित ३ रुग्ण आहेत. त्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. अशातच स्वच्छतेच्या दृष्टीने त्यांचे कपडे, बेड शीट्स या वेळोवेळी बदलल्या जातात. मात्र, आता हे कपडे आणि बेड शीट्स कोणी धुवायच्या? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यवतमाळ शासकीय रुग्णालयातील धोब्यानी हे कपडे धुण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे.
यवतमाळमधील कोरोनाग्रस्तांचे कपडे कोण धुणार? - corona positive india
यवतमाळमध्ये दुबईहून आलेल्या पर्यटकांपैकी तिघे कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यांना यवतमाळ शासकीय रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवले आहे. या तिघांवर उत्तम पद्धतीने उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा देखील होत आहेत. स्वच्छतेच्या दृष्टीने त्यांना स्वछ कपडे, बेड शीट्स पुरविण्यात येतात.
यवतमाळमध्ये शासकीय यंत्रणा कोरोनाशी लढायला सज्ज झाली आहे. यवतमाळमध्ये दुबईहून आलेल्या पर्यटकांपैकी तिघे कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यांना यवतमाळ शासकीय रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवले आहे. या तिघांवर उत्तम पद्धतीने उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा देखील होत आहेत. स्वच्छतेच्या दृष्टीने त्यांना स्वछ कपडे, बेड शीट्स पुरविण्यात येतात. तसेच वापरलेले कपडे आणि बेड शीट्स सफाई कामगाराने शासकीय लाँड्रीध्ये आणून टाकले. मात्र, हे कपडे धुण्यास धोब्यानी नकार दिला आहे. त्यामुळे हे कपडे कोण धुणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच रुग्णालय प्रशासन या कपड्यांचे काय करणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.