यवतमाळ - जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या दुप्पट आहे. शनिवारी १२३ जण कोरोनामुक्त झाले असून ६० जण पॉझिटिव्ह आले. तर ३ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यातील दोन मृत्यू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर एक मृत्यू खाजगी रुग्णालयात झाले आहे.
पॉझिव्हीटी दर ११.२२ टक्के -
शनिवारी एकूण ४१३४ जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी ६० जण नव्याने पॉझिटिव्ह आले तर ४०७४ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात ८४६ रुग्ण ॲक्टीव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती ३८१ तर गृह विलगीकरणात ४६५ रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७२३४६ झाली आहे. २४ तासात १२३ जण कोरोनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या ६९७२२ आहे. तर जिल्ह्यात एकूण १७७८ मृत्यूची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६ लाख ४४ हजार ५३९ चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी ५ लाख ७० हजार ९८३ निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिव्हीटी दर ११.२२ असून दैनंदिन पॉझिव्हीटी दर १.४५ आहे तर मृत्यूदर २.४६ आहे.