यवतमाळ- वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात भरती असलेल्या दोन जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 80 वर पोहोचली आहे. विलगीकरण कक्षात भरती असलेल्या 124 जणांना सुट्टी देण्यात आली आहे. मात्र, आरोग्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून त्यांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
यवतमाळमध्ये 2 पॉझिटिव्ह रुग्ण वाढल्याने संख्या 80 वर;124 जणांना विलगीकरण कक्षातून सुट्टी - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
यवतमाळमध्ये 2 पॉझिटिव्ह रुग्ण वाढल्याने ॲक्टिव्ह कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 80 पोहोचली आहे. 124 जणांना विलगीकरण कक्षातून सुट्टी देण्यात आली असून त्यांना गृह विलगीकरणात ठेवले आहे. वैद्यकीय महाविद्यालयाने आणखी 7 रिपोर्ट तपासणीसाठी पाठवले आहेत.
मागील 24 तासात दोन जण विलगीकरण कक्षात नव्याने भरती झाले आहेत. त्यामुळे भरती असलेल्या रुग्णांची संख्या 141 असून यापैकी 61 प्रिझमटिव्ह केसेस आहेत. तसेच 24 तासात 14 रिपोर्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झाले. यापैकी दोन रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. शुक्रवारी वैद्यकीय महाविद्यालयाने तपासणीकरीता सात नमुने पाठविलेत.
जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत तपासणीकरीता पाठविलेल्या नमुन्यांची संख्या एकूण 1162 असून यापैकी 1155 रिपोर्ट प्राप्त तर सात रिपोर्ट अप्राप्त आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झालेले एकूण निगेटिव्ह रिपोर्ट 1064 आहे. सद्यस्थितीत संस्थात्मक विलगीकरणात 108 जण असून गृह विलगीकरणात एकूण 1081 जण आहेत.