यवतमाळ - केंद्र सरकारने लादलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात दिल्ली येथे देशभरातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. आता शेतकरी मरतील पण कायदा रद्द केल्याशिवाय परत येणार नाही. अशी भूमिका घेतली आहे. या आंदोलनाला काँग्रेसने समर्थन दिले आहे. तसेच विदर्भातील पाच हजार शेतकरी या दिल्लीतील आंदोलनात सहभागी होणार आहेत. दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला समर्थन म्हणून आता यवतमाळ येथील आझाद मैदानामध्ये काँग्रेसच्यावतीने केंद्र सरकारच्याविरोधात धरणे आंदोलन देण्यात आले.
काँग्रेसकडून दोन महिन्यापासून विविध आंदोलने
शेतकरी विरोधी तीन काळे कायदे रद्द व्हावे याकरिता काँग्रेसच्यावतीने मागील दोन महिन्यापासून सातत्याने विविध आंदोलने केली जात आहेत. किसान महामेळावा, किसान हक्क दिवस विविध जिल्ह्यामध्ये धरणे आंदोलन, राजभवनावर पदयात्रा काढून राज्यपालांना निवेदन देण्यात आले, ट्रॅक्टर रॅली, या कायद्याविरोधात स्वाक्षरी मोहीमही राबवली आहे, यात राज्यभरातील जवळपास 60 लाख शेतकऱ्यांनी स्वाक्षरी केल्या आहेत. त्यामुळे आता हे तीन कायदे रद्द केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे.
उद्योगपतींसाठी केलेला हा कायदा