यवतमाळ -पेट्रोल, डिझेलच्या किमतीत रोज वाढ होत आहे. त्याचा फटका सामान्य नागरिक आणि वाहन चालकांना बसत आहे. याच पार्श्वभूमीवर संताप व्यक्त करीत पुसदमध्ये काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
यवतमाळ : पुसदमध्ये इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचे आंदोलन - पुसद कॉंग्रेस आंदोलन
कोरोनामुळे सामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारच्या सात वर्षातील कारभाराने देश २५ वर्षे अधोगतीकडे गेला असून त्याचे गंभीर परिणाम देशातील जनतेला भोगावे लागत आहेत. मागील सात वर्षांत मोदींनी विकासाच्या नावाखाली देश भकास करुन ठेवला आहे. काँग्रेसच्या सरकारने ७० वर्षात देशाला समृद्ध, स्वाभिमानी राष्ट्र म्हणून जगात ताठ मानेने उभे केले त्याची पुरती वाताहात लावून देश रसातळाला लावल्याचा आरोपही यावेळी आंदोलकांनी केला.
महागाई वाढत असताना केंद्रातील मोदी सरकार याकडे लक्ष देत नाही. त्यांना केवळ अदानी, अंबानी यांची चिंता असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. कोरोनामुळे सामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारच्या सात वर्षातील कारभाराने देश २५ वर्षे अधोगतीकडे गेला असून त्याचे गंभीर परिणाम देशातील जनतेला भोगावे लागत आहेत. मागील सात वर्षांत मोदींनी विकासाच्या नावाखाली देश भकास करुन ठेवला आहे. काँग्रेसच्या सरकारने ७० वर्षात देशाला समृद्ध, स्वाभिमानी राष्ट्र म्हणून जगात ताठ मानेने उभे केले त्याची पुरती वाताहात लावून देश रसातळाला लावल्याचा आरोपही यावेळी आंदोलकांनी केला. यावेळी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाही देण्यात आल्या. महागाई कमी न केल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
हेही वाचा -नागपुरात पेट्रोल, डिझेल दरवाढ विरोधात काँग्रेसचे आंदोलन