महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काँग्रेस, राष्ट्रवादी नावालाही उरली नाही - मुख्यमंत्री फडणवीस

'मोदी नावाच्या त्सुनामीनुळे राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी नावालाही उरली नाही', असा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा यवतमाळ जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर राळेगाव येथील सभेला ते संबोधित करत होते.

By

Published : Aug 5, 2019, 11:23 PM IST

काँग्रेस, राष्ट्रवादी नावालाही उरली नाही - मुख्यमंत्री फडणवीस

यवतमाळ - 'मोदी नावाच्या त्सुनामीनुळे राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी नावालाही उरली नाही', असा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा यवतमाळ जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर राळेगाव येथील सभेला ते संबोधित करत होते. काँग्रेस पक्ष अध्यक्ष, नेता आणि नीती नसलेला पक्ष असून राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था 'कोठेही शाखा आणि कार्यकर्ते नाही' अशी झाली आहे अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

फडणवीस पुढे म्हणाले, राज्य सरकारने ५ वर्षाच्या काळात आदिवासी विकासाच्या अनेक योजना राबवून आदिवासींना लाभ मिळवून दिला. शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला. कर्जमाफी, बोंडअळी मदत, अवर्षण, दुष्काळ, अतिवृष्टी या सर्व संकटात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिले. यवतमाळ जिल्ह्यातील शेवटच्या शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ मिळेपर्यंत कर्जमाफीची योजना सुरु ठेवणार असल्याची ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी दिली.

यावेळी राळेगावचे आमदार तथा आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, माजीमंत्री प्रवीण पोटे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, वणी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, जिल्हा सरचिटणीस अमोल ढोने आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details