यवतमाळ - महाविकास आघाडी सरकारमध्ये एकामागून एक प्रकरणे समोर येत आहेत. कधी राष्ट्रवादी काँग्रेस तर कधी शिवसेना पक्षाच्या मंत्र्यांची प्रकरणे राज्यात गाजत आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी राज्यातील काँग्रेस नेत्यांना राज्याचा कारभारावर अहवाल मागविला असल्याची चर्चा होत आहे. यावर काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांना अहवाल मागविला नसून पक्षाचे जनरल सेक्रेटरी यांना अहवाल मागविला असल्याचे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.
'काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांना नाही तर जनरल सेक्रेटरींना मागितला अहवाल' - yavatmal political news
महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्व एकत्र आहोत. मुख्यमंत्री हे आमचे नेते आहे, ते जे काही निर्णय घेतील तो सर्वांना मान्य राहणार आहे, असे यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
'मुख्यमंत्र्यांचा निर्णय सर्वांना मान्य'
महाविकास आघाडी म्हणून सर्व एकत्र विरोधी पक्षांचे नेते जे काही सांगत आहेत ते सर्व बरोबर आहेत. महाविकास आघाडीमधील सर्व मंडळी चुकीचे सांगत आहेत असे नाही. महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्व एकत्र आहोत. मुख्यमंत्री हे आमचे नेते आहे, ते जे काही निर्णय घेतील तो सर्वांना मान्य राहणार आहे आणि हेच आमच्या काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी आम्हाला सांगितले आहे. त्या अनुषंगाने आम्ही काम करीत आहोत. महाविकास आघाडी पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल. काँग्रेसच्या कुठल्याही मंत्र्यांना अहवाल मागितला नसून आमच्या पक्षाचे जनरल सेक्रेटरी यांना अहवाल मागितला आहे, ते देतील, असे ठाकूर यांनी सांगितले.