यवतमाळ - राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे धुमशान सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे नेते मुकुल वासनिक हे यवतमाळ येथे काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी आले असता, त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी वासनिक यांनी भाजप आणि शिवसेना सरकारवर जोरदार टीका केली आहे.
काँग्रेसचे नेते मुकुल वासनिक हे यवतमाळ येथे काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी आले असता, त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला मुकुल वासनिक यांचे भाजप-सेना सरकारवर टीकास्त्र
राज्यात आणि देशात सद्या विचित्र परिस्थिती आहे. भाजप आणि शिवसेना धर्म आणि जातीच्या नावाखाली समाजात दुफळी निर्माण करण्याचे काम करत आहे. या माध्यमातून मते मिळवण्याचा प्रयत्न ते करत आहेत, अशी टीका वासनिक यांनी यवतमाळमध्ये बोलताना केली आहे.
हेही वाचा... देशात मॉब लिंचींग आहे, हे संघाने मान्य करावे; ओवैसींचे संघावर टिकास्त्र
लोकसभेचे अपयश अनपेक्षीत त्याच्यावर विचार सुरू - वासनिक
2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रचार व्यवस्थीत झाला मात्र आलेला निकाल अनपेक्षित होता, त्याबाबत विचार आम्ही आपण करत आहेत. तसेच हा निकाल जनतेलाही अपेक्षीत नव्हता, असेही वासनिक यावेळी म्हणाले.
हेही वाचा... देवेंद्र फडणवीसांवर मोदी-शाहंचा वरदहस्त, पाहा काय म्हणतायेत राजकीय विश्लेषक
राहुल गांधी महाराष्ट्रात प्रचाराला येणार
काँग्रेस नेते राहुल गांधी महाराष्ट्रात निवडणुकीच्या प्रचारात दिसत नसल्याची टीका विरोधक करत आहे. याबाबत वासनिक यांना विचारले असता, त्यांनी राहुल गांधी यांच्या प्रचाराचा कार्यक्रम आखला आहे. त्याला अंतिम स्वरूप लवकरच मिळेल आणि राहुल हे महाराष्ट्राच्या निवडणुकीत सक्रिय भूमिका पार पाडतील, असा विश्वास व्यक्त केला.