यवतमाळ - लोकशाही अबाधित ठेवायची असेल तर बॅलेट पेपरवरच निवडणुका घेण्यात याव्यात आणि ईव्हिएम मशीन पूर्णपणे बंद करण्यात यावे. या मागणीसाठी काँग्रेससह इतर पक्षांनी आज बसस्थानक चौकात आंदोलन केले.
ईव्हीएम मशीन बंद करून बॅलेट पेपरवर मतदान घ्या, यवतमाळमध्ये काँग्रेसचे आंदोलन - काँग्रेसचे आंदोलन
पाश्चिमात्य देशांमध्ये ईव्हीएम वर निवडणुका बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकाही ईव्हीएम मशीनवर न घेता बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात. या मागणीसाठी 21 ऑगस्टला मुंबईत मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले. तर विरोधी पक्षाचे अत्यंत कमी उमेदवार निवडून आले. यामुळे ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा झाल्याचे उघड होत आहे. ईव्हीएम मशीन हॅक करण्यात येत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे मशीन बाबत तक्रारी करण्यात आल्या. याचे पुरावेसुद्धा निवडणूक विभागाला देण्यात आले आहेत.