लस न घेणाऱ्यांच्या सवलती शासनाने बंद कराव्या - माजीमंत्री मोघे - यवतमाळ लसीकरण
ग्रामीण भागातील नागरिक मुख्य प्रवाहात यावा, त्यांचे राहणीमान उंचवावे, यासाठी त्यांना शासनाच्या अनेक सवलती मिळत आहे. कोरोना सारख्या आजाराची लस ही त्यांना दिली जात आहे. मात्र, केवळ अपप्रचारतुन ही लस घेण्यास टाळाटाळ करत आहे. परिणामी याचा फटका बऱ्याच नागरिकांना बसू शकतो. तेव्हा ग्रामीण नागरिक जर लस घेण्यास तयार नसेल तर त्यांना शासनाकडून मिळणाऱ्या सवलती बंद केल्या पाहिजे, असे मत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष शिवाजीराव मोघे यांनी व्यक्त केले.
यवतमाळ - सध्या कोरोनाचा कहर सुरू आहे. तरीसुद्धा नागरिक दक्ष नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यात अडथळे निर्माण होत आहे. शिवाय या आजारावर अद्याप औषध नाही. आता लस शिवाय पर्याय नाही. मात्र काही नागरिक लसबाबत अपप्रचार करतांना दिसत आहे. याला ग्रामीण भागातील अज्ञान ही कारणीभूत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना लस घेण्यासाठी एक विशिष्ट कालावधी द्यावा आणि जे लस घेणार नाही अशा नागरिकांच्या शासनाच्या सवलती बंद कराव्या, अशी मागणीच माजीमंत्री अॅड. शिवाजीराव मोघे यांनी शासनाकडे केली आहे.