यवतमाळ - आयसोलेशन कक्षात भरती असलेल्या आणि 'निजामुद्दीन मरकझ'शी संबंध असलेल्या 8 नागरिकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने यवतमाळ शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे यवतमाळ शहरातील कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या नागरिकांचे वास्तव्य असलेला गुलमोहर पार्क आणि मोमीनपुरा भाग प्रशासनाने पूर्णपणे शटडाऊन केला आहे. तर या परिसरातील 3 किलोमीटर पर्यंतच्या भागातही सीमाबंदी करण्यात आली आहे.
यवतमाळ शहरातील 35 ठिकाणी कडकडीत बंद.... हेही वाचा...'आरोग्य सेतू' अॅपडाऊनलोड करा, मोदींचे देशवासियांना आवाहन
शहरातील प्रभाग क्रमांक 10 मधील इंदिरानगर, पवार पुरा, भोसा रोड, हिंदू स्मशान भूमी परिसर, कोहिनूर सोसायटी, गुलमोहर सोसायटी, शहादा बाग, रुग्णालय सोसायटी, कापसे लेआउट, बिलाल नगर, अल्मास नगर, नागसेन सोसायटी, सिद्धेश्वर नगर समोरील परिसर, शर्मा ले आउट, तायडे नगर, अल कबीर नगर, फैज नगर, अहैबाब सोसायटी, गुलशन नगर, प्रभाग क्रमांक 20 मधील भोसा गावठाण, गोल्डन पार्क रोड, डेहनकर ले आऊट भाग एक व दोन, सव्वालाखे ले आऊट, मंगेश नगर, सुंदर नगर, क्रिसेंट शाळा परिसर, मेमन सोसायटी, मालानि झोपडपट्टी, रुक्मिणी नगर, संजय गांधीनगर, बोरूले भाग-2, तांडा वस्ती, डीएड कॉलेज परिसर, शंभरकर लेआउट, अंबर लॉन परिसर, सारस्वत लेआउट, प्रभात नगर येथील सर्व दुकाने आणि संपूर्ण परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे.
हेही वाचा...बारामतीत कोरोनाचा पहिला बळी
पोलीस विभागाला पुढील आदेश येईपर्यंत 500 होमगार्डची मदत प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच या भागात आरोग्य विभागाच्या 50 टीममार्फत प्रत्येक घराची तपासणी करण्यात येणार येत आहे. यासाठी एक उपविभगीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक आणि आरोग्य अधिकारी यांच्यासोबत आरोग्य विभागाच्या प्रत्येकी 25 टीम राहणार आहे. आरोग्य विभागाच्या चार लोकांचा या प्रत्येक टीममध्ये समावेश असणार आहे. पहिल्या टीममध्ये यवतमाळचे उपविभागीय अधिकारी आणि आर्णीचे तहसीलदार तसेच वरील सर्व अधिकारी तर दुसऱ्या टीममध्ये दारव्हाचे उपविभागीय अधिकारी आणि बाभुळगावचे तहसीलदार राहणार आहेत. आज (गुरुवार) सकाळपासून हा सर्व्हे सुरू झाला असून तो 'डोअर टू डोअर' केला जात आहे.