यवतमाळ- जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप दिवसागणिक वाढत आहेत. याची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने यवतमाळसह पांढरकवडा, नेर पुसद, दिग्रस आणि दारव्हा लगतच्या काही भागात 31 जुलैपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन घोषित केले आहेत. अत्यावश्यक बाबी वगळता सर्व व्यवहार सात दिवसासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे.
यादरम्यान, केवळ दवाखाने आणि औषधांची दुकाने सुरू राहणार असून दूध विक्रेत्यांना काही तासांची सवलत देण्यात आली आहे. यादरम्यान भाजीबाजारही बंद राहील. पण फळ आणि भाजी फिरून विकण्यास सकाळी सात ते दहापर्यंत मुदत देण्यात आली आहे. स्वस्त धान्य दुकाने आणि कृषी केंद्र ही सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.