यवतमाळ - दहावीची परीक्षा सुरू होती. ज्या दिवशी संस्कृतचा पेपर त्याच दिवशी सानिकाच्या वडिलांचे मृत्यू झाले. मात्र, वडील गेल्याचे दुःख पचवत सानिकाने त्या दिवशीच्या म्हणजेच संस्कृतच्या पेपरमध्ये 100 पैकी 100 गुण घेत यश संपादन केले आहे. याबाबत ‘ईटीव्ही भारत’ने वृत्त दिले होते. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी तिला भेटायला बोलवत तिचे कौतूक केले.
आता स्वप्न पूर्ण होईपर्यंत थांबायचे नाही; दोन आयएएस अधिकाऱ्यांकडून सानिकाच्या पाठीवर कौतुकाची थाप
वडिलाच्या मृत्यूच्या दिवशी असलेल्या दहावीच्या संस्कृत पेपरमध्ये सानिकाने 100 पैकी 100 गुण मिळवले. 97.60 टक्के गुण घेत तिने यश संपादन केले. तीचे कौतूक जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचांळ यांनी केले आहे.
यवतमाळ तालुक्यातील हिवरी गावातील सुधाकर पवार यांची ही सानिका नावाची मुलगी. ती इंग्लिश मीडियम स्कूल यवतमाळची विद्यार्थिनी आहे. 6 मार्चला सुधाकर पवार यांनी सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र, अशाही परिस्थितीत खंबीर राहून सानिकाने दहावीचा पेपर दिला आणि त्यानंतर वडिलांचे अंत्यसंस्कार केले. मात्र, डोळ्यातील अश्रू पुसत तिने स्वतःला सावरले आणि पेपर दिला. दहावीत तिने 97.60 टक्के गुण मिळवत घवघवीत यश मिळवले. भविष्यात तिला डॉक्टर बनायचे आहे.
याबाबत ईटीव्ही भारतने 'कौतुकास्पद..! बोर्ड परीक्षेच्या दिवशी वडिलांचा मृत्यू तरीही 'तिने' मिळवले 97.60 टक्के गुण', या मथळ्याखाली वृत्त दिले. याच वृत्ता दखल घेत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ या दोन्ही आयएएस अधिकाऱ्यांनी तिला दिल्या. तसेच जीवनात शिक्षणच हेच सर्वकाही आहे. परिस्थिती कुठलीही असो त्यावर मात करत पुढे जावे. आपले ध्येय गाठावे, असे यावेळी तिला मार्गदर्शन केले. या दोन अधिकाऱ्यांच्या या मोलाच्या मार्गदर्शनामुळे मला जीवन जगताना आणि आयुष्याची पुढील लढाई लढण्यात बळ मिळाले, असे सानिकाने यावेळी सांगितले.