नागपूर -यवतमाळ जिल्ह्यातील अपूर्ण प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यासाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच सिंचन प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. त्यांनी विधीमंडळ सभागृहात यवतमाळ जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.
अधिवेशन काळात विदर्भातील जिल्ह्यांच्या आढावा बैठकांचे नियोजन करण्यात येते. स्थानिक पातळीवर तातडीने निर्णय होण्यासाठी राज्यातील इतरही भागात जिल्हानिहाय आढावा बैठका घेण्यात येतील. अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासकीय मदत निधी जिल्ह्यांना पोहोचला आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.