महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळ जिल्ह्यातील सरपंचांसोबत मुख्यमंत्र्यांनी ‘ऑडिओ ब्रीज’च्या माध्यमाने साधला संवाद - जिल्हा प्रशासन

मुख्यमंत्री यांच्या संवाद सेतू कार्यक्रमात त्यांनी जवळपास ४० सरपंचांशी संवाद साधला. पाण्याची टाकी बांधणे, पाणी पुरवठा योजनेची अर्धवट कामे पूर्ण करावी, सिंचन विहिरी आणि हातपंपांची दुरुस्ती करावी, प्रस्तावित नळ योजनांना मंजुरी द्यावी, रोहयोची कामे सुरु करावी, टँकरचा पाणी पुरवठा करावा, अशाप्रकारच्या मागण्या प्रामुख्याने सरपंचांनी मांडल्या. मुख्यमंत्र्यांनी या सर्व मागण्या जिल्हा प्रशासनाने तातडीने पूर्ण करण्याबाबत लक्ष घालण्याचे निर्देश दिले.

मुख्यमंत्र्यांचा जिल्ह्यातील सरपंचांसोबत ‘ऑडिओ ब्रीज’द्वारे संवाद

By

Published : May 14, 2019, 7:54 AM IST

यवतमाळ - ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी, हाताला काम आणि जनावरांना चारा-छावणी मिळेल, असे नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आज वर्षा निवासस्थानी ऑडिओ ब्रीजच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यातील सरपंचांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पाणी टंचाई आणि रोजगार हमी योजनेच्या कामाचा आढावा घेतला.

मुख्यमंत्र्यांचा जिल्ह्यातील सरपंचांसोबत ‘ऑडिओ ब्रीज’द्वारे संवाद

मुख्यमंत्री म्हणाले, काही ग्रामस्थांनी मागणी केल्याप्रमाणे राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत पाण्याची व्यवस्था करावी. सरपंचांनी मागणी केल्याप्रमाणे पाण्याच्या बाबतीतील सर्व प्रस्ताव तातडीने मंजूर करावेत. पिण्यासाठी जनावरे आणि ग्रामस्थांना पाणी मिळेल तसेच ग्रामस्थांना रोजगार हमीची कामे मिळतील, याकडे जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे.

मुख्यमंत्री यांच्या संवाद सेतू कार्यक्रमात त्यांनी जवळपास ४० सरपंचांशी संवाद साधला. पाण्याची टाकी बांधणे, पाणी पुरवठा योजनेची अर्धवट कामे पूर्ण करावी, सिंचन विहिरी आणि हातपंपांची दुरुस्ती करावी, प्रस्तावित नळ योजनांना मंजुरी द्यावी, रोहयोची कामे सुरु करावी, टँकरचा पाणी पुरवठा करावा, अशाप्रकारच्या मागण्या प्रामुख्याने सरपंचांनी मांडल्या. मुख्यमंत्र्यांनी या सर्व मागण्या जिल्हा प्रशासनाने तातडीने पूर्ण करण्याबाबत लक्ष घालण्याचे निर्देश दिले.

९ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित

यवतमाळ जिल्ह्यात एकूण १६ तालुके असून त्यातील ९ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. यवतमाळ, बाभुळगाव, कळंब, केळापूर, राळेगाव, मोरेगाव, महागाव, उमरखेड आणि दारव्हा तालुक्यात पाणीटंचाई आहे. तर ८ तालुक्यांमधील २३ गावांमध्ये एकूण २३ टँकर सुरु आहेत. पुसद ९, नेर ३, यवतमाळ ३, घाटंजी २, बाभुळगाव २, दारव्हा २, महागांव १, आर्णी १ असे एकूण २३ टँकर सुरु आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ यवतमाळ जिल्ह्यात आज अखेर एक तात्पुरती नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करुन व १०० विहिरींचे अधिग्रहण करुन पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्याची दक्षता घेण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याच्या नळ पाणी पुरवठा योजनांची ४९.५० लाख रुपये इतकी विद्युत देयकांची रक्कम महावितरण कंपनीस देण्यात आली आहे. तसेच सर्व नळ पाणी पुरवठांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुळकणी, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता मडावी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आडे तसेच तालुक्याच्या ठिकाणी संबंधित तहसीलदार, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच उपस्थित होते. दुष्काळग्रस्त तालुक्यातील मिनाक्षी सुकडे, ललिता टोणे, पंकज लगडे, अजय गाडगे, वसंत जाधव, सुनील चव्हाण, सुधाकर साळूंके, जयश्री खंडारे, अंकुश मुनेश्वर, उमेश राऊत, रमेश दवणे यांच्यासह जवळपास ४० सरपंचांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.

ABOUT THE AUTHOR

...view details