महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

स्वराज्याच्या विरोधात जाणाऱ्यांना ईव्हीएमचे बटन दाबून टकमक टोकावरून ढकलून घ्या - यवतमाळ विधानसभा निवणूक 2019

दिग्रस येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी हे विधान केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By

Published : Oct 14, 2019, 8:28 PM IST

यवतमाळ - छत्रपती शिवाजी महाराज यांची आपल्याला परंपरा आहे. स्वराज्याला धोका निर्माण करणाऱ्यांना महाराज टकमक टोकावरून ढकलून द्यायचे. आता लोकशाही आहे. लोकशाहीत कुणाला टकमक टोकावरून ढकलून देता येत नाही. जे स्वराज्याच्या विरोधात जातील अशांना ईव्हीएमचे बटन दाबून त्यांना टकमक टोकावरून ढकलून द्यायचे आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. ते दिग्रस येथे जाहीर सभेत बोलत होते.

राहुल गांधीनी पक्क माहित आहे की महाराष्ट्रात कितीही डोकं आपटंल तरी 24 पेक्षा जास्त जागा येणार नाहीत, म्हणून ते बँकॉकला फिरायला गेले. या निवणुकीत चुरस दिसून येत नसून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांची आघाडी निराश आणि हताश आहे, अशी टिका मुख्यमंत्र्यांनी केली.

हेही वाचा - VIDEO...जेव्हा प्रवीण पोटे फोटो काढण्यासाठी करतात आटापिटा

दिग्रस भाजपचे संजय देशमुख यांना याच मैदानावर भाजपमध्ये प्रवेश दिला होता. त्यांना समजावून सांगितले. मात्र, त्यांनी बंडखोरी केली. अपक्ष निवडणूक लढविली. आता महायुतीच्या उमेदवार संजय राठोड यांच्या समोर संजय देखामुख उभे राहिले. आता त्यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले.

हेही वाचा - तपास अधिकारी बदला; कॉ. पानसरेंच्या कुटुंबीयांची न्यायालयात मागणी

आता फक्त महायुतीच्या 230 -240 जागा येतील हीच चर्चा सर्वत्र सुरू आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या 15 वर्षांपेक्षा आम्ही 5 वर्षात दुप्पट काम केले नसेल तर मत मागायला जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

ABOUT THE AUTHOR

...view details