यवतमाळ -जिल्ह्यातील मारेगांव-मार्डी रोड लगत भरवस्तीत असलेल्या कापड व हार्डवेअर दुकानाला आग लागून संपूर्ण कापड दुकान जळून खाक झाले. या आगीमुळे शेजारील एका दुकानाला आग लागली. मात्र, २ तासाच्या अथक परिश्रमानंतर आग विझविण्यात युवकांना व अग्निशमन दलाला यश आले. या घटनेत लाखोंचे नुकसान झाले असून ही आग रात्रीच्या सुमारास शॉर्ट सर्किटने लागली असल्याची शक्यता आहे.
रविंद्र काळे यांचे ५ वर्षापासून कापड दुकान आहे. या दुकानात कपडे फर्निचर सामान भरून होते. मात्र, रात्री अचानक लागलेल्या आगीने संपूर्ण दुकान जळून खाक झाले आहे. ही आग लाईनच्या शॉर्ट सर्किटने लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या आगीने उग्र रूप धारण केले होते यामुळे आगीचे व धुराचे लोळ आकाशात पसरू लागले. तर, दुकानाच्या शेजारी असलेल्या घरांनाही आगीची किरकोळ झड पोहचली. आगीची वार्ता माहिती होताच येथील युवक घटनास्थळावर दाखल झाले.