महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपच्या सांगण्यावरून चित्रा वाघ यांची पोपटपंची; शिवसेना जिल्हाप्रमुखांचा हल्लाबोल - यवतमाळ शिवसेना न्यूज

पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येसंदर्भात ज्या ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहेत, त्या बनावट आहेत. यात केवळ आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. हा आरोप फक्त विरोधी पक्ष भाजपकडूनच केला जात आहे. या प्रकरणी अद्याप कोणाकडूनही फिर्याद दाखल झाली नाही किंवा संबंधित मुलीच्या घरचे कुटुंबीयही समोर यायला तयार नाहीत. मात्र, हेतूपुरस्सर एखाद्या मंत्र्याला बदनाम करण्याचे काम भाजपकडून सुरू आहे, असा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी केला.

यवतमाळ शिवसेना न्यूज
यवतमाळ शिवसेना न्यूज

By

Published : Feb 13, 2021, 6:53 PM IST

यवतमाळ - 'काल-परवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या चित्रा वाघ यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला. आपले अस्तित्व दाखवण्यासाठी त्या मंत्र्यांवर गरळ ओकत आहेत. इतकेच नव्हे तर, भारतीय जनता पक्षाच्या सांगण्यानुसार त्यांनी मंत्र्यांच्या विरोधात पोपटपंची सुरू केली आहे. यवतमाळचे मंत्री विदर्भातील शिवसेनेचे वजनदार नेते आहेत. विदर्भात शिवसेना वाढत चालली असल्याने देवेंद्र फडणवीस यांना भारी पडत आहे. त्यामुळेच यवतमाळच्या मंत्र्यावर पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणावरून आरोप करण्याचा घाट सुरू आहे,' असा हल्लाबोल शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यावर केला आहे.

'भाजपच्या सांगण्यावरून चित्रा वाघ यांची पोपटपंची'
ऑडिओ क्लिप बनावट

पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येसंदर्भात ज्या ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहेत, त्या बनावट आहेत. यात केवळ आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. हा आरोप फक्त विरोधी पक्ष भाजपकडूनच केला जात आहे. या प्रकरणी अद्याप कोणाकडूनही फिर्याद दाखल झाली नाही किंवा संबंधित मुलीच्या घरचे कुटुंबीयही समोर यायला तयार नाहीत. मात्र, हेतूपुरस्सर एखाद्या मंत्र्याला बदनाम करण्याचे काम या माध्यमातून भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे कंपू करत आहेत, असा आरोपही गायकवाड यांनी केला.

लक्ष विचलित करण्याचा घाट

देशात व राज्यात भाजप सत्तेत असताना ज्या समस्या निर्माण केल्या, त्या समस्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठीच हा प्रकार सुरू आहे. शिवसेनेच्या या मंत्र्याकडे गोंदियापासून अमरावती पर्यंत संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी दिली आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेना विदर्भात बळकट होईल, यासाठीच हा भाजपकडून केविलवाणा प्रकार सुरू केला आहे. एखादे प्रकरण उकरून काढायचे आणि जनतेचे लक्ष विचलित करायचे, यातीलच हा प्रकार असल्याचा आरोप राजेंद्र गायकवाड यांनी केला.

ABOUT THE AUTHOR

...view details