यवतमाळ - संपूर्ण देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत आवश्यक ती सेवा देणाऱ्या यंत्रणा दिवसरात्र काम करत आहेत. कोरोनाविरोधातील या लढ्यात दारव्हा तालुक्यातील महागाव कसबा येथील दुधे परिवारातील 2 चिमुकल्यांनी आपल्या वाढदिवसाची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
कोरोनाशी लढण्यासाठी चिमुकल्यांची मदत, वाढदिवसाची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुपूर्द - Yavatmal news
महागाव कसबा येथील देवल धर्मेंद्र दुधे व सोहम निखिल दुधे यांनी प्रत्येकी 5 हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी करीता स्थानिक प्रशासनाला सुपूर्द केला. चिमुकल्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोरोनाशी लढण्यासाठी चिमुकल्यांची मदत, वाढदिवसाची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुपूर्द
महागाव कसबा येथील देवल धर्मेंद्र दुधे व सोहम निखिल दुधे यांनी प्रत्येकी 5 हजार रुपयांचे धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी करीता स्थानिक प्रशासनाला सुपूर्द केला. चिमुकल्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी माजी जि. प. अध्यक्षा प्रीतीला दुधे, उपसरपंच धर्मेंद्र दुधे, कृषी अधिकारी नालंदा भरणे, मंडळ अधिकारी डी.डी डोल्हारकर, तलाठी विलास गिरी, पोलीस पाटील सुजाता लाड , ग्रामसेवक गजानन गावंडे हजर होते.
Last Updated : Apr 10, 2020, 11:01 AM IST