यवतमाळ -पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली या भागात महापुराने थैमान घातले. यामध्ये जवळपास 25 हजारांवर कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले. अशा स्थितीत त्यांना मदत व्हावी, यासाठी आर्णी येथील चैत्यन आर्य वैश्य महिला मंडळाकडून कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्तांसाठी मदत फेरी काढण्यात आली.
यवतमाळातील चैत्यन आर्य वैश्य महिला मंडळाकडून पूरग्रस्तांना मदत - help for flood affected people
आर्णी येथील चैत्यन आर्य वैश्य महिला मंडळाकडून कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्तांसाठी मदत फेरी काढण्यात आली. या मदत फेरीच्या माध्यमातून रोख रक्कमेसह साड्या, बेडशीट, भांडी आदी साहित्य गोळा करण्यात आले आहे.
चैत्यन आर्य वैश्य महिला मंडळ
या मदत फेरीच्या माध्यमातून रोख रक्कमेसह साड्या, बेडशीट, भांडी आदी साहित्य गोळा करण्यात आले. जमा झालेले हे साहित्य तहसीलदार श्रीकांत निळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे. पूरग्रस्तांना मदत पुरवण्याचे आवाहन तहसीलदार श्रीकांत निळे यांनी नागरिकांना केले होते. त्या अनुषंगाने शहरी आणि ग्रामीण भागातील अनेक लोक आपआपल्या परीने मदत करण्यासाठी पुढे येत आहेत.