यवतमाळ- मध्यवर्ती सहकारी बँकेला आठ मेच्या मध्यरात्री भीषण आग लागली होती.यात बँकेचे मोठ्याप्रमाणावर कागदपत्रे जळाली होती. यानंतर ही आग लागली की लावली गेली याच्यावर तर्क वितर्क लावण्यात आले. यामुळे ही बँक वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. पण ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱयामध्ये कैद झाले आहे.
यवतमाळ जिल्हा सहकारी बँक आग प्रकरण; शॉर्टसर्किटमुळेच आग लागल्याचे सीसीटीव्हीत उघड - आग
मध्यवर्ती सहकारी बँकेला आठ मे च्या मध्यरात्री भीषण आग लागली होती. यात बँकेचे मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे जळाली होती.
त्यामुळे ही आग शॉर्टसर्किटमुळेच लागल्याचे आता स्पष्ट झाले आहे. रात्री एकच्या सुमारास इलेक्ट्रिक केबलमध्ये शॉर्टसर्किट होऊन ती आग अन्यत्र पसरली. बँकेत लाकडी फर्निचर आणि कागदपत्रे असल्याने आग पसरत गेली. पण, ही गोष्ट वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. बाजूलाच नगरपालिकेचे फायर स्टेशन असल्याने तात्काळ आग विझवण्यात आली होती. यातून एक बाब उघड़कीस आली की, शॉर्टसर्किट टाळण्यासाठी अश्या म्हत्तवाच्या ठिकाणी एमसीबी (MCB) आणि ईएलसीबी (ELCB) लावतात. कुठेही शॉर्टसर्किट झाले तर तात्काळ वीज पुरवठा खंडित होऊन समोरचा अनर्थ टळतो. पण, या ठिकाणी करोडोचे व्यवहार असलेल्या बँकेत फायर अलार्म का लावण्यात आला नाही असाही प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.