यवतमाळ- वणी वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांसोबत कर्तव्यावर असलेल्या होमगार्डने ट्रिपल सीट असलेल्या दुचाकीस्वाराला दंड का मागितला, असा जाब आमदार बोदकुरवार यांनी विचारला. यामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने होमगार्डने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी. यासाठी जिल्हा वाहतूक विभागाची उपशाखा सुरू करण्यात आली आहे. या विभागात पोलीस कर्मचारी कमी असल्याने त्यांच्या मदतीसाठी 20 होमगार्ड देण्यात आले आहेत. होमगार्ड प्रकाश बोढे हे टीळक चौकात वाहतूक पोलिसांच्या मदतीने वाहतूक व्यवस्था सुरळीत करत होते. त्यावेळी दुचाकीवरून (एम एच 29 ए क्यू 7853) ट्रिपल सीट जाणाऱ्या युवकाला थांबवले व दंड भरावा लागेल, असे सांगितले. त्यातील एका युवकाने याबाबत आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना माहिती दिली.