यवतमाळ- घांटजी शहरातील वसंतनगरमधील रहिवासी मिलिंद चंद्रकांत लोहकरे (वय 36) या व्यावसायिकाने स्वतःच्या गोदामात पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. व्यवसायात आलेल्या आर्थिक संकटातून ही आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे.
आर्थिक संकटामुळे व्यावसायिकाची आत्महत्या, काही दिवसांवर होते लग्न - yavatmal news
मिलिंद लोहकरे यांचा ५ जानेवारीला नागपूर येथे साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपला होता. स्टेशनरी साहित्य विक्रीचा त्यांचा व्यवसाय आहे. व्यवसायात प्रचंड मंदीचे सावट असल्यामुळे आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. त्यामुळे त्यांनी मालाच्या गोदामामध्ये पंख्याला गळफास लाऊन आत्महत्या केली.
![आर्थिक संकटामुळे व्यावसायिकाची आत्महत्या, काही दिवसांवर होते लग्न businessman-committed-suicide-in-yavatmal](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5744742-thumbnail-3x2-y.jpg)
हेही वाचा-संजय राऊत यांची हकालपट्टी करा; संभाजी भिडेंची मागणी
मिलिंद लोहकरे यांचा ५ जानेवारीला नागपूर येथे साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपला होता. स्टेशनरी साहित्य विक्रीचा त्यांचा व्यवसाय आहे. व्यवसायात प्रचंड मंदीचे सावट असल्यामुळे आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. त्यामुळे त्यांनी मालाच्या गोदामामध्ये पंख्याला गळफास लाऊन आत्महत्या केली. घरून दुकान उघडण्यासाठी सकाळी गेलेले मिलिंद यांनी बराच उशीर होऊनही दुकान का घडले नाही? याच्या चौकशीसाठी घरची मंडळी दुकानाकडे गेली असता हा प्रकार समोर आला. पुढील तपास घाटंजी पोलीस करीत असून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.