यवतमाळ - पत्नीशी अनैतिक संबंध असल्यामुळे मोठ्या भावाने आपल्या सख्ख्या भावाची खून केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कळंब तालुक्यातील परसोडी( दिघडे) येथे घडली. बाल्या उर्फ प्रविण रमेश दगडे (३८) असे आरोपीचे तर किरण रमेश दिघडे (३५) असे मृताचे नाव आहे.
पत्नीशी अनैतिक संबंधातून भावाचा कुर्हाडीने खून; कळंब तालुक्यातील घटना - Yavatmal Crime News
किरण दिघडे याचे मोठा भाऊ प्रविण दिघडे याच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. या अनैतिक संबंधामुळे प्रविण संतापला होता. दरम्यान, घरातील सदस्य शेतात काम करण्यासाठी गेले असता प्रविणने बाजेवर झोपेत असलेल्या लहान भाऊ किरण याच्या मानेवर कुऱ्हाडीचे वार केले आणि त्याला जागीच ठार केले.
किरण दिघडे याचे मोठा भाऊ प्रविण दिघडे याच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. यावरून मागील काही दिवसापासून या दोघांमध्ये वाद होत होता. या अनैतिक संबंधामुळे प्रविण संतापला होता. दरम्यान, घरातील सदस्य शेतात काम करण्यासाठी गेले असता प्रविणने बाजेवर झोपेत असलेल्या लहान भाऊ किरण याच्या मानेवर कुऱ्हाडीचे वार केले आणि त्याला जागीच ठार केले.
या घटनेची माहिती पोलीस पाटील सुरेश नारायण भगत यांनी पोलीस ठाण्याला कळविले. त्यानंतर ठाणेदार विजय राठोड, पीएसआय विनोद जांभळे, जमादार धारणे यांनी त्वरित घटनास्थळ गाठून आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर घटनेची माहिती घेत आरोपी बाल्या उर्फ प्रवीण रमेश दीघडे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ठाणेदार विजय राठोड यांच्या मार्गदर्शनानुसार तपास सुरू आहे.