यवतमाळ- जिल्ह्यातील आर्णी गावापासून 15 किलोमीटर अंतरावर कोसदनी घाटात अति पावसामुळे नाल्यावरील पूल वाहून गेला आहे. त्यामुळे सकाळी साडेपाच वाजल्यापासून नागपूर तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील संपुर्ण वाहतूक ठप्प झाली आहे.
अति पावसामुळे नागपूर-तुळजापूर मार्गावरील पूल गेला वाहून; वाहतूक ठप्प - HEAVY RAIN
आर्णी गावापासून 15 किलोमीटर अंतरावर कोसदनी घाटात अति पावसामुळे नाल्यावरील पूल वाहून गेला आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प आहे.
नागपूर-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंट रोडचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील आर्णीपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोसदनी घाटाजवळ राष्ट्रीय मार्गाचे काम सुरू आहे. वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून या पुलाच्या बाजूला असलेल्या नाल्यावरती छोटा पूल टाकण्यात आला. मात्र, या परिसरात पहाटेपासून जोरदार पावसाने हजेरी लावल्याने या पावसाच्या पाण्याने या नाल्यावरील छोटा पूल वाहून गेला आहे. परिणामी या महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे रस्त्यावर ३ ते ४ किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत.