यवतमाळ- 'मुलगा-मुलगी एकसमान' हे केवळ बोलूनच नाही तर कृतीत आणल्याचा प्रत्यय दिग्रस येथे नुकताच आला आहे. येथील गाडगे परिवाराने आपल्या मुलीच्या लग्नाची वरात घोड्यावर काढली आहे. त्यांच्या या कृतीतून त्यांनी समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.
कौतुकास्पद.! नवरीची घोड्यावरून वरात; मुलगा-मुलगी एकसमान असल्याचा दिला संदेश - marriage
गाडगे परिवारातील नेहाचा शुभविवाह वर्धा येथील कुणाल शिवपाल कडू यांच्याशी आनंदात पार पडला. यावेळी गाडगे परिवाराने आपल्या मुलीच्या लग्नाची वरात घोड्यावर काढली. याप्रसंगी लोकांना ‘मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी’ या म्हणीचा प्रत्यय आला.
गाडगे परिवारातील नेहाचा शुभविवाह वर्धा येथील कुणाल शिवपाल कडू यांच्याशी आनंदात पार पडला. यावेळी गाडगे परिवाराने आपल्या मुलीच्या लग्नाची वरात घोड्यावर काढली. याप्रसंगी लोकांना ‘मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी’ या म्हणीचा प्रत्यय आला. त्याचबरोबर गाडगे परिवाराने आपल्या मुलीची वरात घोड्यावर काढून 'मुलगामुलगी एकसमान' असल्याचे कृतीतून साकारत समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला. यावेळी मुलीने वरातीमध्ये आजीआजोबा व इतर नातेवाईकांबरोबर नाचून नवरदेवाप्रमाणेच वरातीचा आनंद लुटला. मुलींनीही अशाप्रकारचा आनंद घेण्याचा अधिकार आहे आणि तो त्यांनी घेतला पाहिजे, असा संदेशच जणू नेहाने तिच्या लग्नात दिला.