यवतमाळ- बोहल्यावर चढण्यापूर्वी एका वधूने राष्ट्रीय कर्तव्याचे भान ठेवत लोकशाहीचा उत्सव खऱ्या अर्थाने साजरा केला. यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पायल डहाके असे वधूचे नाव आहे.
येथे बोहल्यावर चढण्यापूर्वी वधूने बजावला मतदानाचा हक्क - विवाह
आर्णी शहरातील संभाजी नगरात राहणाऱ्या पायल डहाके या वधूने विवाहापूर्वी आपला मतदानाचा हक्क बजावला.
नववधूने बजावला मतदानाचा हक्क
आर्णी शहरातील संभाजी नगरात राहणाऱ्या पायलचा विवाह आज अमरावती जिल्ह्यातील अंजनगावचा रहिवासी असलेला प्रशांत गुल्हाने या तरुणाशी ठरला. हा विवाह सोहळा आज दाभडी येथील ओंकारेश्वर मंदिरात पार पडणार होता. तत्पूर्वी, पायलने मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.