यवतमाळ- राळेगाव तालुक्यातील सावरखेडा येथील विवाह सोहळ्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. शेतकरी पंढरीनाथ दुर्गे यांच्या प्रणाली या मुलीचा विवाह चंद्रपूर येथील निकेश झोटिंग या मुलाशी करण्यात आला. या विवाह सोळव्यात नवरी मुलीची वरात चक्क ट्रॅक्टरवरून काढण्यात आली. एवढच नाही तर नवरी चक्क ट्रॅक्टर चालवत मंडपात दाखल झाली. मी शेतकऱ्याची मुलगी असून माझा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा असल्याचे प्रणाली म्हणाली.
चक्क ट्रॅक्टर स्वार होऊन नवरी पोहचली मंडपात; शेतकरी आंदोलनाला दिला पाठिंबा - bride-come-tractor-place-wedding-yavatmal
कृषी संस्कृती असलेल्या देशाच्या राजधानीत शेतकरी गेल्या तीन महिन्यापासून कृषी कायदे रद्द करण्यासाठी आंदोलन करीत आहे. शेतकरी जगाचा पोशिंदा आहे आणि शेतकरी कन्या असल्याचा मला अभिमान आहे. केंद्रसरकार आणत असलेल्या कृषी कायद्याला विरोध असून ट्रॅक्टर चालवून दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचे प्रणालीने स्पष्ट केले.
चक्क ट्रॅक्टर स्वार होऊन नवरी पोहचली मंडपात
मी शेतकऱ्याची मुलगी माझा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा
कृषी संस्कृती असलेल्या देशाच्या राजधानीत शेतकरी गेल्या तीन महिन्यापासून कृषी कायदे रद्द करण्यासाठी आंदोलन करीत आहे. शेतकरी जगाचा पोशिंदा आहे आणि शेतकरी कन्या असल्याचा मला अभिमान आहे. केंद्रसरकार आणत असलेल्या कृषी कायद्याला विरोध असून ट्रॅक्टर चालवून दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचे प्रणालीने स्पष्ट केले. या विवाहाची संपूर्ण राळेगाव तालुक्यात चर्चा होत आहे.
Last Updated : Feb 19, 2021, 7:50 PM IST
TAGGED:
yavatmal wedding news