यवतमाळ : दिवसेंदिवस पेट्रोलचे दर वाढत चालले आहे. यावर वर्षाला एक गाडीला लाखावर पेट्रोलचा खर्च येतो. त्यामुळे यवतमाळच्या साकेत सुभाष डोंगरे मेकॅनिकल इंजिनियर युवकाने थेट इलेक्ट्रीक बाईट तयार केली आहे. केवळ दहा रुपयात म्हणजेच दोन युनिटमध्ये ही (Ecofriendly Electric Bike) इलेक्ट्रीक बाईक शंभर किलोमीटरचा प्रवास करता येणार आहे. भंगारात गेलेल्या दुचाकीवर हा प्रयोग केला असून तो यशस्वी झाला आहे. भंगारातील दुचाकीचे इंजिन काढून त्यावर लिथेमाईन बॅटरी बसविली आहे. पंधरामिनिटांत चार्ज होणारे वाहन शंभर किमी प्रवास करते.
वाहनांची स्क्रॅपिंग पॉलिसी
पंधरा वर्षाच्यावरती वाहनांना रस्त्यावर धावण्यास बंदी घातली आहे. असे वाहन पर्यावरणास मोठ्या प्रमाणात हानी पोहोचवितात. यामुळे हे वाहन भंगारात जमा होणार आहे. अशा परिस्थितीत भंगारात जाणार्या वाहनांना इलेक्ट्रीक डिव्हाइस बसवून पुन्हा कामात आणता येणार आहे. हे साकेतने त्याच्या प्रयोगातून सिध्द केले आहे. कोणत्याही कंपनीच्या वाहनावर हा प्रयोग चालणार आहे. यामध्ये वाहनधारकांला पेट्रोल भरण्याची आवश्यकता नाही. इलेक्ट्रीक बॅटरीवर असे वाहन धावणार आहे.
परवडेल असा दर
बाजारात असलेल्या इलेक्ट्रीक वाहनाच्या नाममात्र दरात हे वाहन रस्त्यावर धावण्यास मदत होणार आहे. आपल्या वाहनाचे इंजिन काढून त्याच्या जागेवर लिथेमाईन बॅटरी अथवा सुपर कॅपेसीटर बसवून हे वाहन पूर्वीप्रमाणे कार्यक्षम करण्यात आले आहे. साकेतने लिथीयम स्वरूपाची बॅटरी लावून वाहनाचे आयुष्य दहा वर्षे वाढवले आहे. ट्रिपल सीट घेता येईल एवढी क्षमता या वाहनात आहे. विशेष म्हणजे साध्या प्लगवरही हे वाहन चार्ज करता येईल.
हेही वाचा -पालिकेवर प्रशासक : खर्चापासून निर्णयाचे सर्व अधिकार आयुक्तांकडे, नगरसेवक पद होणार रद्द!