महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रक्तसंकलन वाहिनीमुळे रक्त संकलनात वाढ होईल- पालकमंत्री संजय राठोड

रक्तसंकलन वाहिनीद्वारे ग्रामीण भागात थेट जाऊन इच्छुकांकडून रक्त संकलन करणे अतिशय सोपे

पालकमंत्री संजय राठोड
पालकमंत्री संजय राठोड

By

Published : Jan 23, 2021, 7:49 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यात सिकलसेल ग्रस्त व थालेसेमियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना दरमहा रक्त द्यावे लागते. तसेच अपघातग्रस्तांनाही रक्ताची जास्त गरज असते. अशावेळी जिल्ह्यात रक्ताचा मुबलक साठा असला पाहिजे. आतापर्यंत सामाजिक संघटना व आरोग्य यंत्रणेच्या वतीने शिबिराच्या माध्यमातून रक्त संकलन केल्या जात होते. भविष्यातही असे रक्तदान शिबिर आयोजित असणार आहे.

ग्रामीण भागातील अनेक रक्तदाते शहरात येऊन रक्तदान करू शकत नाही. रक्तसंकलन वाहिनीद्वारे ग्रामीण भागात थेट जाऊन इच्छुकांकडून रक्त संकलन करणे अतिशय सोपे होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात रक्त साठा वाढण्यास मदत होईल, असे पालकमंत्री तथा वनमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. ते वैद्यकीय महाविद्यालयात रक्तसंकलन वाहिनीच्या लोकार्पण सोहळ्यात उद्घाटक म्हणून बोलत होते.

अत्याधुनिक रक्त संकलन वहिनी-

महाराष्ट्र वन विकास महामंडळाकडून वैद्यकीय महाविद्यालयाला हस्तांतरित करण्यात आलेली रक्तवाहिनी ही अत्याधुनिक स्वरूपाची आहे. या रक्तसंकलन वाहिनीची किंमत 26 लाख असून यामध्ये एकावेळी दोन रक्तदाते रक्त देऊ शकतात. तसेच संकलित रक्ताच्या पिशव्या ठेवण्यासाठी 60 लिटरचा फ्रिजर, 6 व्यक्ती बसू शकणार असून बायोटॉयलेटची व्यवस्था आहे.

शिबिराचा खर्च वाचणार-

जिल्ह्यात शासकीय महाविद्यालयाने 2018 मध्ये 123 शिबिरे घेऊन 14000 रक्तपिशव्या संकलित केल्या. 2019 मध्ये 128 शिबिरांच्या माध्यमातून 13500 आणि 2020 मध्ये कोणाचा प्रादूर्भाव असतानाही 142 शिबिराच्या माध्यमातून 9570 रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. मात्र हे वाहन आल्याने आता शिबिरावरील खर्च काही प्रमाणात कमी होणार आहे.

या रक्त संकलन वाहिनी लोकार्पण कार्यक्रमात राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. रामबाबू, वन विकास महामंडळाचे मुख्य व्यवस्थापक श्रीनिवास राव, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामराव, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषद अध्यक्ष कालींदा पवार, मारली महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे उपस्थित होते.

हेही वाचा-'जय श्रीराम'च्या घोषणा देणाऱ्यांना दीदींनी सुनावलं, भाषण करण्यास दिला नकार

ABOUT THE AUTHOR

...view details