महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू; भाजप महिला आघाडीचा इशारा - पूजा चव्हाण प्रकरण संजय राठोड

या प्रकरणात मंत्र्याचे नाव समोर येते, ते आरोपी असतील तर त्यांच्यावरती तत्काळ गुन्हा दाखल करण्यात येऊन या तरुणीला न्याय द्यावा, नाहीतर भाजप महिला आघाडी व भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला.

यवतमाळ
यवतमाळ

By

Published : Feb 13, 2021, 8:25 PM IST

यवतमाळ- पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केल्याप्रकरणी शिवसेनेचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर येत आहे. पालक हा कुटुंबाचा प्रमुख असतो आणि त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी असते. पालकच अशा प्रकारचे कृत्य करीत असेल तर त्यांना पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. या प्रकरणात मंत्र्याचे नाव समोर येते, ते आरोपी असतील तर त्यांच्यावरती तत्काळ गुन्हा दाखल करण्यात येऊन या तरुणीला न्याय द्यावा, नाहीतर भाजप महिला आघाडी व भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला.

यवतमाळ

मंत्र्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी
सामान्यता आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी एखाद्या प्रकरणात साधारण व्यक्तीवर तातडीने कारवाई करण्यात येते. मात्र, या प्रकरणामध्ये खुद्द मंत्री असल्याने तपास दिरंगाईने सुरू असून या मंत्र्यांवर तातडीने गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी. महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस मधील मंत्र्यांच्या विरोधातही असेच प्रकरण समोर आले होते. आणि आता तर खुद्द मुख्यमंत्र्यांच्या शिवसेना पक्षातील मंत्री असल्याने त्यांना पाठीशी घालण्यात येत आहेत का असा प्रश्न यावेळी उपस्थित केला. या प्रकरणात शासनाने तातडीने दखल न घेतल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details