यवतमाळ- जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर सोमवारी जिल्हा परिषदेत सभापतींची निवड करण्यात आली. या निवडीवर भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्याम जयस्वाल यांनी आक्षेप घेतला आहे.
जिल्हा परिषद सभापती निवडीवर भाजपचा आक्षेप - Yavatmal Zilla Parishad news
जिल्हा परिषद सभापती निवडीवर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्याम जयस्वाल यांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे सभापतींची निवड वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत.
यवतमाळ जिल्हा परिषद
जिल्हा परिषदेत काँग्रेस आणि भाजपची आघाडी मोडीत निघाली. त्यानंतर महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केली. सोमवारी सभापतीपदी सेनेचे श्रीधर मोहोड, विजय राठोड तर काँग्रेसकडून जयश्री पोटे, राम देवसरकर यांची वर्णी लागली.
जिल्ह्यात विधान परिषद निवडणूक आचारसंहिता लागू आहे. या काळात सभापती निवडणूक घेता येत नाही, असा दावा माजी उपाध्यक्ष जयस्वाल यांनी केला. त्यामुळे सभापतींची निवड वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत.