महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आर्णी विधानसभेचे तिकीट कापल्याने भाजपचे आमदार राजू तोडसाम करणार बंडखोरी

भाजपने नुकतीच विधानसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. यात आर्णी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजू तोडसाम त्यांचे तिकीट कापण्यात आले आहे. त्यामुळे आमदार राजू तोडसाम बंडखोरी करण्याची शक्यता आहे.

राजू तोडसाम

By

Published : Oct 1, 2019, 7:14 PM IST

यवतमाळ- भाजपने नुकतीच विधानसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. यात आर्णी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजू तोडसाम त्यांचे तिकीट कापण्यात आले आहे. त्यामुळे ते भाजप सोबत बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी दाखल करून निवडणुकीच्या रिंगणात उभे राहणार आहे. भाजप पक्ष श्रेष्ठींकडून सुरुवातीपासून मला या मतदारसंघाची उमेदवारी देतो, असे सांगण्यात आले. मला कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता माझे तिकीट नाकारण्यात आले. माझे काय चुकले हे सांगण्यात सुद्धा आले नसल्याचे आमदार तोडसाम यांनी सांगितले.

हेही वाचा - पक्षांतर करणाऱ्या भामट्यांना मत नाही तर 'लाथा' मारा - बच्चू कडू

आर्णी विधानसभा मतदारसंघात भाजपने माजी आमदार डॉ. संदीप धुर्वे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, तोडसाम यांच्या बंडखोरीने धुर्वेंना ही निवडणूक चांगलीच जड जाणार आहे. मागील पाच वर्षात लोकप्रतिनिधी म्हणून अनेक विकासा कामे तोडसाम यांनी केली आहेत. सामान्य जनतेशी माझी नाळ अजूनही टिकून आहे. जनतेचा माझ्यावर अजूनही विश्वास आहे. मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचेही त्यावेळी त्यांनी सांगितले. मात्र, पक्षश्रेष्ठींनी अचानक मला उमेदवारी न देता दुसऱ्यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे या मतदारसंघातून अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. तीन ऑक्टोबरला नामनिर्देशन पत्र भरण्याचे सुतोवाच त्यांनी केले आहे.

हेही वाचा - निवडणूक आयोगाची तळीरामांवर करडी नजर

ABOUT THE AUTHOR

...view details