महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सर्वांनी एकजूटीने लढल्यास सेना - भाजपचे पानिपत शक्य - माणिकराव ठाकरे

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यास तयार आहे. सर्वांनी एकत्र आल्यास सेना-भाजपचे पानिपत शक्य आहे, असे काँगेसचे जेष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी म्हटले आहे.

सर्वांनी एकजूटीने लढल्यास सेना - भाजपचे पानिपत शक्य - माणिकराव ठाकरे

By

Published : Aug 2, 2019, 4:36 PM IST

यवतमाळ - एका विचारधारेशी सहमत असलेल्या पक्षांनी एकत्र आल्यास भाजप व शिवसेना यांना सहज हरवता येऊ शकेल. सर्व विरोधी पक्षांनी एकजूटीने लढल्यास सेना-भाजपचे पानिपत शक्य असल्याचे वक्तव्य काँगेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी केले. यवतमाळमध्ये माध्यमांसोबत बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली.

सर्वांनी एकजूटीने लढल्यास सेना - भाजपचे पानिपत शक्य - माणिकराव ठाकरे

आंबेडकरांनी बोलावल्यास आम्ही त्यांच्या दारी चर्चेसाठी जायला तयार

कोणत्याही पक्षाची एक वैचारिक बांधिलकी असते. काँग्रेस विचाराच्या पक्षाने एकत्र आल्यास शिवसेना व भारतीय जनता पक्षाला आगामी विधानसभेत आपण निश्चितच हरवू शकतो. त्याकरिता सर्वांनी एकत्र यावे. काँग्रेस पक्ष नेहमीच समोपचाराची भुमिका घेत आला आहे. मात्र, एकतर्फी प्रयत्न न होता दोन्हीकडून प्रयत्न झाले पाहिजे. वंचित बहुजन आघाडीसोबत तसे बोलणे झाले आहे. त्यादृष्टीने पत्र व्यवहारही होत आहे. एक पत्र काँग्रेसकडून वंचित बहुजन आघाडीला पाठवले आहे. आता बाळासाहेब आंबेडकर हे सांगतील त्या ठिकाणी, घरी बोलावल्यास त्यांच्या घरी आम्ही चर्चेस तयार आहोत. असे काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details