महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वनमंत्री संजय राठोड यांच्या मतदारसंघात "जय सेवालाल"च्या जयघोषाने दुमदुमला आसमंत - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण

अनेक ठिकाणी सेवालाल महाराजांच्या प्रतिमेच्या पालखी मिरवणुकी काढण्यात आली. साखरा येथील पालखी मिरवणुकीत पारंपरिक वेष परिधान केलेल्या महिला व तरुणी सहभागी झाल्या होत्या तर रुई येथे सेवालाल महाराजांच्या वेशभूषेतील घोड्यावर स्वार युवक सहभागी झाला होता.

"जय सेवालाल"च्या जयघोषाने दुमदुमला आसमंत
"जय सेवालाल"च्या जयघोषाने दुमदुमला आसमंत

By

Published : Feb 17, 2021, 7:46 AM IST

यवतमाळ- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे सध्या बंजारा समाज चर्चेत आला आहे. राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांना या आत्महत्येस जबाबदार धरले जात असताना, बंजारा समाजाकडूनही पूजा चव्हाण प्रकरणाचा तपास करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात होती. दरम्यान, सध्या चर्चेत असलेल्या बंजारा समाजाने आणि विशेषत: वनमंत्री राठोड यांच्या मतदारासंघातील समाज बाधवांनी बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली आहे.

"जय सेवालाल"च्या जयघोषाने दुमदुमला आसमंत

वणवण भटकणाऱ्या बंजारा समाजाला प्रगतीचा मार्ग दाखविला. समाजातील अंधश्रद्धा, रूढी परंपरेवर प्रहार करत जगण्याचा मार्ग दाखविला. त्यामुळे संत सेवालाल महाराज यांची जयंती प्रतिवर्षी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. यंदा पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर तिच्या न्यायासाठी बंजार समाज आक्रमक झाला होता. त्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या सेवालाल जयंतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष्य लागले होते.

थाटात निघाल्या मिरवणूका

दिग्रस तालुक्यात बंजारा समाजबांधव मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. त्यामुळे संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यासह दिग्रस तालुका हा बंजारा बहुल भाग म्हणून ओळखला जातो. दिग्रसच्या ग्रामीण भागातील साखरा, वसंतनगर, रुई तलाव, आरंभी, चिंचोली क्रं.२, काटी सह इतर गावातील बंजारा समाज बांधवांकडूनही संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी करण्यात आली. अनेक ठिकाणी सेवालाल महाराजांच्या प्रतिमेच्या पालखी मिरवणुकी काढण्यात आली. साखरा येथील पालखी मिरवणुकीत पारंपरिक वेष परिधान केलेल्या महिला व तरुणी सहभागी झाल्या होत्या तर रुई येथे सेवालाल महाराजांच्या वेशभूषेतील घोड्यावर स्वार युवक सहभागी झाला होता. रुई येथील मिरवणुकीत तलवारबाजीचे प्रत्यक्षिक सुद्धा सादर करण्यात आले. काही ठिकाणी डीजेच्या तालावर थिरकणारे युवा वर्ग मिरवणुकीत सहभागी होते.

ABOUT THE AUTHOR

...view details