यवतमाळ - जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धनाच्यादृष्टीने पक्षी अत्यंत महत्वाचे आहेत. पक्षांची जैवविविधता झपाट्याने कमी होत आहे. अनेक पक्षी प्रजाती दूर्मीळ श्रेणीत समाविष्ट होत आहे. पक्षांचे महत्व लक्षात घेता ५ नोव्हेंबरपासून पहिल्यांदाच राज्यात पक्षीसप्ताह साजरा केला जात आहे. मारुती चितमपल्ली यांच्या जन्मदिनपासून ते पक्षीमित्र डॉ. सलीम अली यांची जयंती 12 नोव्हेंबर या कालावधीत पक्षी गणना केली जाणार आहे.
राज्यात पहिल्यांदाच पक्षीसप्ताह पक्ष्यांची गणना होणार...
जिल्ह्यात येणारे पक्षी, त्यांची नावे, ठिकाण, कालावधी यांची सर्व माहिती सप्ताहात संकलित केली जात आहे. पक्षी हा सृष्टीतील महत्वाचा घटक आहे. बदलत्या पर्यावरणाचे इंडिकेटर म्हणूनही पक्षाला संबोधले जाते. झपाट्याने कमी होत असलेल्या पक्षांची संख्या पाहता अनेक पक्षी दूर्मीळ झाले आहे. या दूर्मीळ पक्षासोबत इतर राज्य व देशविदेशांतून येणार्या पक्षांची माहिती, पक्ष्यांचे निसर्गातील महत्व, संकटग्रस्त पक्षी त्यांचे अधिवास, स्थलांतर, येणारे पक्षी, ठिकाण आदी माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी, त्यांना पक्षांचे महत्व कळावे, यासाठी वनविभागाने पुढाकार घेतला आहे.
स्थंलातरासाठी नोव्हेंबर महत्वाचा...
नोव्हेंबर महिन्यात अनेक पक्षी स्थंलातर करतात. हा काळ स्थलातंराच्यादृृष्टीने महत्वाचा आहे. त्यामुळे या काळात अनेक पक्षांच्या प्रजातीची माहिती संकलित होऊ शकते. म्हणूनच वन्यजीवविषयक साहित्यनिर्मितीत अग्रणी असणारे निवृत्त वनाधिकारी मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिन ते द बुक ऑफ इंडियन बर्डसच्या आधारावर अनेक पक्षीमित्र घडविणारे पक्षीमित्र डॉ. सलीम अली यांच्या जयंतीदिनपर्यंत राज्यभरात पक्षी सप्ताह साजरा केला जात आहे.