महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रोड रोलरला दुचाकीची धडक, दुचाकीस्वार ठार - दुचाकी अपघात

वडकी-राळेगाव मार्गावरील भांब गावाजवळ उभ्या रोड रोलरला दुचाकीने धडक दिल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली. त्यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.

yavatmal
दुचाकीची रोड रोलरला धडक

By

Published : Dec 6, 2019, 9:45 PM IST

यवतमाळ - वडकी-राळेगाव मार्गावरील भांब गावाजवळ उभ्या रोड रोलरला दुचाकीने धडक दिल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली. त्यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. गणेश सुरेश शिवणकर (28, रा. झाडगाव) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

दुचाकीची रोड रोलरला धडक

झाडगाव येथील रहिवासी असलेला गणेश हा संध्याकाळी ७ च्या सुमारास राळेगाव येथे असलेल्या भावाला घेण्यासाठी जात होता. दरम्यान, भांब या गावाजवळील रस्त्यावर उभ्या असलेल्या रोड रोलरला त्याच्या दुचाकीची धडक बसली. या घटनेत गणेशचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात गणेशचा मृत्यू झाल्याने झाडगाव येथील ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details