यवतमाळ- यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघातील शिवसेना भाजप युतीच्या उमेदवार भावना गवळी एक लाख १७ हजार ९३९ मताधिक्यांनी विजयी झाल्या आहेत. काँग्रेसचे दिग्गज नेते तथा माजी प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा भावना गवळी यांनी पराभव केला. शिवसेनेच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून गुलाल उधळत जोरदार जल्लोष केला. या जल्लोषात जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले.
यवतमाळ-वाशिममधून शिवसेनेच्या भावना गवळी पाचव्यांदा दिल्लीत - pravin pavar
शिवसेना भाजप युतीच्या उमेदवार भावना गवळी एक लाख १७ हजार ९३९ मताधिक्यांनी विजयी झाल्या आहेत. काँग्रेसचे दिग्गज नेते तथा माजी प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा भावना गवळी यांनी पराभव केला. शिवसेनेच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून गुलाल उधळत जोरदार जल्लोष केला.
![यवतमाळ-वाशिममधून शिवसेनेच्या भावना गवळी पाचव्यांदा दिल्लीत](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3369868-thumbnail-3x2-gavali.jpg)
खासदार भावना गवळी
मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच विद्यामान खासदार भावना गवळी यांनी आघाडी घेतली. शेवटच्या फेरीअखेर भावना यांनी एक लाख १७ हजारांचे मतदान घेऊन विजय मिळवला. भावना गवळी यांनी यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून लोकसभेत निवडून यायची हॅट्ट्रिक केली. दोन वेळा वाशिम जिल्ह्यातून त्या खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांच्या या विजयामुळे केंद्रात मंत्रिपदाची संधी त्यांना चालून आली आहे.
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा विजय
कुणाला किती मते मिळाले?
- भावना गवळी (भाजप) - ५४२०९८
- माणिकराव ठाकरे (काँगेस) - ४२४१५९
- डॉ. प्रवीण पवार (वंचित बहुजन आघाडी) - ९४२२८
- वैशाली येडे (प्रहार जनशक्ति) - २०६२०
- पी. बी. आडे (अपक्ष) - २४४९९
- नोटा - ३९६६