यवतमाळ- यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघासाठी आज (सोमवारी) भावना गवळी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माझी लढाई ही काँग्रेससोबत नसून वंचित बहुजन आघाडीसोबत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. मोदी सरकारने जो विकास केला या विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
माझी लढाई वंचित बहुजन आघाडीसोबत - भावना गवळी - भावना गवळी
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघासाठी आज (सोमवारी) भावना गवळी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माझी लढाई ही काँग्रेससोबत नसून वंचित बहुजन आघाडीसोबत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

पुढे त्या म्हणाल्या, की देशाच्या संरक्षणाच्या हितासाठी मोदी शासनाने जो निर्णय घेतला या निर्णयामुळे नागरिक खुश आहेत. माझ्यासाठी ही निवडणूक सोपी असून मागील २० वर्षात जी विकासात्मक कामे केली आहेत ते घेऊन जनतेसमोर जाणार असल्याची प्रतिक्रिया भावना गवळी यांनी यावेळी दिली.
शिवसेना भाजप युतीच्या अधिकृत उमेदवार भावना गवळी यांचा नामांकन अर्ज दाखल करताना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खासदार अनिल देसाई, पालकमंत्री मदन येरावार, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, युवा सेना सचिव सरदेसाई, आमदार अशोक उईके, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, माजी आमदार प्रकाश दादा डहाके, माजी आमदार बाळासाहेब मूनगिनवार, जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड, पराग पिंगळे सर्व शिवसेना-भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.